मंदिर
समितीच्या योजना
1)
अन्नछत्र कायमठेव योजना
श्री संत जगद्गुरू तुकाराम भवन येथील तळमजल्यावर अन्नछत्र चालविले जाते.
या योजनेमध्ये भाविकांनी गुंतविलेल्या रकमेच्या व्याजातून दरवर्षी
भाविकांनी सुनिश्चित केलेल्या तिथी/तारखेस अन्नदान करणेत येते.यासाठी
किमान ठेव रक्कम रूपये 5 हजार ठेवणे आवश्यक आहे. सध्या अन्नछत्रामध्ये
दररोज 700 ते 800 भाविक प्रसादाचा लाभ घेतात. अन्नछत्राची वेळ दुपारी 12
ते 2 अशी आहे.
2)
महानैवेद्य कायम ठेव
श्रीविठ्ठलरूक्मिणी
मंदिर समिती मार्फत श्रींस दररोज
महानैवेद्य समर्पित
केला जातो. या योजनेमध्ये भाविकांनी किमान रक्कमरूपये 15 हजार गुंतविलेस
त्याचे व्याजातून दरवर्षी त्या भाविकांचे नांवे त्यांनी सुनिश्चित
केलेल्या व समितीकडे उपलब्ध असलेल्या तारखेस श्रींस महानैवेद्य समर्पित
केला जातो.
3)
गोशाळा पशुखाद्य कायम ठेव योजना
मंदिर समिती संचलित यमाई तलावाचे जागेत
गोशाळा असून सध्या गोशाळेत गायी, वासरे, मिळून 70 ते 80 पशुधन आहे.
गोशाळेतील दररोज निघालेल्या दुधाचा श्रीं चे दैनंदिन उपचारासाठी वापर केला
जातो. गोशाळेतील गायीच्या खाद्यासाठी कायमठेव योजना कार्यान्वीत केली असून
या योजनेत किमान रू. 15 हजार रक्कम गुंतवल्यास त्या रकमेच्या व्याजातून
भाविकांनी सुचित केलेल्या दिवशी त्यांचे नांवे गायीना खाद्य पुरविणेत
येते.
मंदिर समितीचे विविध उपक्रम
1)
श्रीसंत ज्ञानेश्वर दर्शन मंडप
पदस्पर्श दर्शन रांग व्यवस्था श्रीसंत
ज्ञानेश्वर दर्शन मंडपातून केलेली आहे. दैनंदिन व यात्रा कालावधीत श्रींचे
दर्शनास येणाऱ्या भाविकांना सुलभ दर्शन व्यवस्था होण्यासाठी दर्शनमंडप
बांधकाम करणेत आलेले आहे. दर्शन मंडपात एकूण 8 गाळे आहेत. सदरच्या 8
गाळ्यामध्ये साधारणत: 10 हजार भाविक प्रत्यक्ष दर्शन घेवू शकतात. प्रत्येक
गाळ्यात स्वच्छता गृहाची व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे. तसेच
दैनंदिन व यात्रा कालावधीत मुखदर्शन व्यवस्था सभामंडपातून केली जाते.
2)
जगद्गुरू श्रीसंत तुकाराम भवन
जगद्गुरू श्री संत तुकाराम भवन
इमारतीमध्ये कथा, कीर्तन, प्रवचन व सप्ताह इ.धार्मिक
कार्यक्रमासाठी बहुउद्देशीयी सभागृह उभारणेत
आलेले आहे.या सभागृहामध्ये सुसज्ज व्यासपीठ, बाल्कनी तसेच ध्वनिक्षेपण
यंत्रणा बसविण्यात आली आहे. सभागृहाची प्रेक्षक क्षमता 2000 इतकी आहे.
किर्तन, प्रवचन, सप्ताह इत्यादी अध्यात्मिक प्रयोजनाकरिता सभागृहाचा
मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो.
4)
अन्नछत्र/प्रसादालय
संत तुकाराम भवन येथील तळमजल्यावर मंदिर समितीतर्फे
मोफत अन्नछत्र चालविले जाते.या ठिकाणी दररोज दुपारी ११ ते २ या वेळेत
प्रसाद भोजनाचे वितरण करण्यात येते. या प्रसादाचा लाभ दररोज ५०० ते ७००
भाविक घेतात. प्रत्येक एकादशीला फराळाच्या पदार्थांचा प्रसाद भाविकांना
वितरीत करण्यात येतो.
5)
यात्री निवास
मंदिर समितीचे सर्वे नंबर 59 मध्ये यात्री
निवासाचे 4 इमारतीचे बांधकाम करण्यात येणार आहे. त्यापैकी एक इमारत मंदिर
समिती, दोन इमारती देगणीदार स्टर्लाइट फौंडेशन, मुंबई व व्हिडीओकॉन
इंटरनॅशनल लि. औरंगाबाद आणि एका इमारतीचे बांधकाम आमदार निधीतून होणार
आहे. तसेच श्री साईबाबा संस्थान
शिर्डी यांचे वतीने देखील एका यात्री निवास इमारतीचे बांधकाम होणार आहे.
यामुळे भाविकांची निवासाची सोय होणार आहे. वेदांत भक्त निवास भाविकांच्या साठी उपलब्ध करून देण्यात आले आहे.
6)
लाडू
प्रसाद व्यवस्था
श्रीं
च्या दर्शनास यणाऱ्या भाविकांना श्रीं चा लाडूप्रसाद मोठ्या प्रमाणावर
उपलब्ध करून दिला जातो. लाडूप्रसादामध्ये विलायची पूड, काजू, बेदाणा
याचाही वापर केला जातो. प्रत्येत शुद्ध एकादशीचे दिवशी दर्शन रांगेतील
भाविकांना शेंगदाणा लाडू उपलब्ध करून दिला जातो.मंदिर समितीच्या लाडू
प्रसादास भाविकांकडून अतिशय मागणी असते. भाविक अत्यंत भक्तीभावाने
लाडूप्रसाद आपल्या नातेवाईक तसेच ईष्टमित्रांना वाटण्यासाठी घेऊन जातात.
7)
फोटो व्यवस्था
श्रीं
च्या
दर्शनास येणाऱ्या भाविकांना श्रीं चे वेगवेगळ्या साईजमधील फोटो
अल्प देणगी मूल्यात उपलब्ध करून दिले जातात.
8) संत साहित्य
ग्रंथालय व
वाचनालय
संत तुकाराम भवन येथील
दुसर्या मजल्यावर संतसाहित्याचा प्रचार-प्रसार, अभ्यास
करणार्या भाविकांकरिता सुसज्ज असे ग्रंथालय सुरू करण्यात आले
आहे. या ग्रंथालयात महाराष्ट्रातील तसेच इतर भागाच्या संतांनी निर्माण
केलेले साहित्य वाचनाकरिता व अभ्यासाकरिता उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
तसेच स्थानिक
वाचकांकरिता स्वतंत्र वाचन कक्ष सुरू करण्यात येत आहे.