||जय जय राम कृष्ण हरी||      ||जय जय राम कृष्ण हरी||    ||जय जय राम कृष्ण हरी||     ||जय जय राम कृष्ण हरी||    ||जय जय राम कृष्ण हरी||    ||जय जय राम कृष्ण हरी||    ||जय जय राम कृष्ण हरी||    ||जय जय राम कृष्ण हरी||    ||जय जय राम कृष्ण हरी||    ||जय जय राम कृष्ण हरी||

              

॥ मंदिरा संबंधित बातम्या ॥

दि. ०८/०४/२०१६ रोजी श्री. विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर येथे गुडीपाडवा नव वर्षा निम्मिता ध्वज पूजन कार्यकारी अधिकारी श्री. शिवाजी कादबाने यांचे हस्ते करण्यात आले सोबत मंदिर कर्मचारी दिसत आहेत.
छायाचित्र पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

दि. ०८/०४/२०१६ रोजी श्री. विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर येथे गुडीपाडवा नव वर्षा निम्मिता श्री. विठ्ठल रुक्मिणी मातेला आकर्षक दागिने परिधान करण्यात आले होते
छायाचित्र पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

दि. ३१-०३-२०१६ श्री. विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे वतीने श्री. विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना दर्शनाची वेळ, दर्शन रांग ठिकाण / मार्ग, पूजा, देणगी, अन्नछत्र, लादुप्रसाद भक्तनिवास, बाहेरील परिवार देवता, ऑनलाईन दर्शन बुकिंग इत्यादीची व इतर अनुषंगिक माहिती देण्यासाठी श्री. संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप येथे सकाळी ६.०० ते रात्री १०.०० या वेळेत चौकशी कक्ष दि. ३१/०३/२०१६ पासुन सुरु करण्यात आला आहे. त्यासाठी मराठी, हिंदी,कन्नड व तेलगु भाषा अवगत असलेल्या दोन कर्मचारयाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तसेच मंदिर समितीचे www.vitthalrukminimandir.org हे संकेतस्थळ मराठी भाषे बरोबर इंग्रजी भाषेत सुद्धा सुरु करणेत आले आहे.
छायाचित्र पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

पंढरपुरात मनाची समजली जाणारी श्री. विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने नामदेव पायरी येथे बुधवारी होळी सनउस्तव साजरा करण्यात आला त्यावेळी कार्यकारी अधिकारी श्री. शिवाजी कादबाने साहेब याचे हस्ते प्रथम होळीची पूजन करण्यात आले. त्या वेळी व्यवस्थापक श्री. विलास महाजन व मंदिर कर्मचारी उपस्तीत होते.
छायाचित्र पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
श्री रुक्मिणी मातेस अर्पण केलेल्या ब्लाउस पिसांचा जाहीर सेल दि.२४/०३/२०१६ ते २७/०३/२०१६ पासुन सकाळी ८ ते रात्री साय. ८ या वेळात तुकाराम भवन येथे चालू आहे. या सेल ला भाविकांचा प्रचंड प्रतिसाद हि मिळत आहे तरी सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा.

श्री. विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूर यथे रंगपंचमी सणनिमित्त सोमवारी श्रीचे मूर्तीवर नैसर्गिक रंग टाकून रंगपंचमी साजरी करण्यात आली. तसेच नामदेव पायरी येथे डफ पूजन करण्यात आले. त्या वेळी श्री शिवाजी कादबाने कार्यकारी अधिकारी श्री विलास महाजन व्यवस्थापक तसेच उप कोषागार अधिकारी श्री. कुलकर्णी साहेब व सर्व मंदिर कर्मचारी उपस्थित होते. त्या नंतर समस्त कलागीवले,तुरेवाले व सर्व मंदिर कर्मचारी यांचे समवेत रंगाची उधळण करीत डफ मिरवणूक मोठ्या थाटामातात काढण्यात आली.
छायाचित्र पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा